COME OUT AS A REAL HERO

Highest Selection from any single Institute
56 Students Joined SPI Aurangabad in last 7 years
Join us to write your success story

Explore Introduction

COME OUT AS A REAL HERO

Highest Selection from any single Institute
56 Students Joined SPI Aurangabad in last 7 years
Join us to write your success story

Explore Introduction

COME OUT AS A REAL HERO

Highest Selection from any single Institute
56 Students Joined SPI Aurangabad in last 7 years
Join us to write your success story

Explore Introduction
img
02
How to take an Admission in SPI Aurangabad

एन.डी.ए महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र एन.डी.ए मध्ये नाही, असे म्हटले जायचे याचे कारण म्हणजे एन.डी.ए ची स्थापना ही महाराष्ट्रातजरी झाली होती तरी या संस्थेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण नगण्य होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९७७ साली औरंगाबाद येथे 'सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टीट्यूट' म्हणजेच 'एस.पी.आय' या संस्थेची स्थापना केली. येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ११ वी व १२ वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा (यू.पी.एस.सी) तसेच सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी) मुलाखतीची तयारीही करवून घेतली जाते. आज पर्यंत या संस्थेने देशाला साडेचारशे पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. आजपर्यंत संरक्षण दलांत अधिकारी पदावर कार्यरत एस.पी.आय च्या माजी विद्यार्थी असलेल्या दोन अधिकार्यांना किर्ती चक्र, तिघांना शौर्य चक्र तर चौदा जणांना सेना मेडल / वायुसेना मेडल ने गौरवण्यात आले आहे. आज संरक्षण दलांच्या अधिकारी पदांमध्ये मराठी टक्का वाढविण्याचे श्रेय निश्चितपणे एस.पी.आय. औरंगाबाद या संस्थेस जाते. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. एस.पी.आयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते.

एस.पी.आय मधील प्रशिक्षण: एस.पी.आयमध्ये विद्यार्थ्यांची ११वी व १२वी (सी.बी.एस.ई ) बरोबरच एन.डी.ए च्या यू.पी.एस.सी. मार्फत घेतल्या जाणार्या प्रवेश परीक्षाची तसेच सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना एन.डी.ए च्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तज्ञांकडून सकाळी व संध्याकाळी मार्गदर्शन केले जाते. येथे विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. विद्यार्थांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एस.पी.आयचे प्रमुख म्हणून सैन्यादालांतील निवृत्त अधिकारी काम पहात असतात.एस.पी.आयचा कॅम्पस : सुमारे १२ एकर च्या प्रशस्त जागेत एस.पी.आयची उभारणी करण्यात आलेली आहे. यात चाणक्य ब्लॉक (मुख्य प्रशासकीय कार्यालय), एकलव्य होस्टेल, मनिष असेम्ब्ली हॉल ( येथे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचन, त्यावर भाषण व गटचर्चा केली जाते ), प्रशस्त व सुसज्य ग्रंथालय, द्रोणाचार्य व्यायामशाळा व बॉक्सिंग रिंग, कुरुक्षेत्र ग्राउंड, बास्केटबॉल ग्राउंड इ. चा समावेश आहे.

शारीरिक प्रशिक्षण: येथे विद्यार्थांचा दिवस सकाळी साडेपाचला सुरु होतो. त्यात रोज सकाळी शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे अनन्यसाधारण महत्व आहे हे लक्षात घेऊन येथील विद्यार्थांना संध्याकाळच्या वेळात सर्व प्रकारचे खेळ शिकविले जातात. त्यात हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, अथल्याटिक्स, क्रॉसकंट्री, अडथळ्यांची शर्यत अशा खेळांचा समावेश असतो. वरील वेळापत्रक सुरळीत पार पाडण्यासाठी व विद्यार्थांना व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी येथील विद्यार्थांची Cadet Captain, Cadet Quarter Master, कोर्स कमांडर अशा विविध पदांवर नेमणूक केली जाते.

प्रवेश : एस.पी.आयमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ११वी साठी प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी दरवर्षी एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात नागपूर, पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद या केंद्रांवर प्रवेश परीक्षा व त्या नंतर मुलाखत घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इयत्ता १०वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत २८ फेब्रुवारी असते. येथे प्रवेशासाठी फक्त महाराष्ट्रीयन मुलेच (पुरुष उमेदवार ) पात्र असतात.

Available
Courses
  • NDA Preparation + 11th and 12th (PCM)
  • NDA and NA II ( September 2014 ) Exam Preparation
  • NDA Weekend Batch
  • SPI Aurangabad Entrance Exam Preparation
  • SSB Interview Preparation
  • CDS & AFCAT Written Exam Preparation
  • Personality Development and English Speaking